गंभीर की नेहरा कोणाचं प्रशिक्षण शुभमनला आवडलं? 

रतीय क्रिकेट संघाचे पुढील ध्येय इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकणे आहे, ज्यासाठी संघाने सज्जता केली आहे. पाच सामन्यांची कसोटी मालिका 20 जूनपासून सुरू होणार आहे. या कसोटी मालिकेसाठी शुभमन गिलकडे टीम इंडियाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. गिल पहिल्यांदाच लीड्समधील हेडिंग्ले येथे कर्णधार म्हणून मैदानात उतरेल. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर भारत मैदानात उतरणार आहे. गिलला तरुण संघाचे नेतृत्त्व करताना दबाव असण्याची शक्यता आहे. मालिकेपूर्वी आता गिलने प्रशिक्षकावर धक्कादायक विधान केले आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या दिग्गज खेळाडूंनी कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर, भारतीय संघ त्यांच्याशिवाय कसोटी मालिका खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल. अशा परिस्थितीत गिलवर खूप दबाव असेल. या कसोटी मालिकेपूर्वी, गिलने एका मुलाखतीत गौतम गंभीर आणि त्याच्या फ्रँचायझी गुजरात टायटन्सचे प्रशिक्षक आशिष नेहराच्या प्रशिक्षक शैलीतील फरकाबद्दल सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *