वस्त्रनगरी वृत्तसेवा / बाबा लोंढे
मुंबई : दिग्दर्शक-अनंत माने, सिनेपत्रकार- ललिता ताम्हणे, बॉलीवूड फोटोग्राफर-बी. के. तांबे, नेपथ्यकार-अशोक पाळेकर, लेखक दिग्दर्शक जगतकुमार पाटील, आदर्श श्रमिक-पांडुरंग परब, आदर्श गृहिणी-रुक्मिणी परब यांचे स्मरनारार्थ सन्मान दिले गेले. नाटककार, दिग्दर्शक डॉ. अनिल बांदिवडेकर हे कलाश्रमच्या उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होते. नेपथ्यकार यश मोडक बॉलीवूड छायाचित्रकार रमाकांत मुंडे, सिने पत्रकार नीलिमा जान्गडा ,पेपर विक्रेता लघुउद्योजक शिवाजी माजलकर हे यंदाचे दखल पत्राचे मानकरी होते.

कलाश्रम’ च्या वतीने प्रत्येक महिन्याला ‘अभियान सन्मान’ हा उपक्रम राबवला जातो. ही संस्था स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील कला केंद्राच्या अंतर्गत काम करते. यंदा होणारा उपक्रम हा ७७ वा आहे. कुठल्याही साली पण मे महिन्यात दिवंगत झालेल्या सहा व्यक्तींचे स्मरण केले जाते. स्पर्धा, प्रत्यक्ष कलाकृती सादरीकरण, पुस्तक प्रकाशन असे त्याचे स्वरूप असते. ज्या दिवंगतच्या नावाने ‘दखलपत्र’ दिले जाते तसे कार्य करणाऱ्या गुणी व्यक्तींची निवड केली जाते. यावेळी बॉलीवूड फोटोग्राफर बी. के. तांबे यांच्या नावाचा पुरस्कार बॉलीवूड फोटोग्राफर रमाकांत मुंडे यांना सन्मानपूर्वक देण्यात आला.याशिवाय सिने पत्रकार, लेखिका ललिता ताम्हणे, नेपथ्यकार अशोक पाळेकर, यांचा समावेश होता. त्यांच्या नावाचा पुरस्कार सिने-नाट्य पत्रकार नीलिमा जांगडा, नेपथ्यकार यश मोडक यांची या दखलपत्रासाठी निवड केली आहे. शिवाय प्रत्येक महिन्याला रोख रक्कम आणि मानपत्र असे स्वरूप असलेल्या अव्वल पुरस्काराने ही गुणीजनांचा सन्मान करण्यात येतो. गेल्या नऊ महिन्यापासून ज्या कामगाराच्या मुलांनी कर्तुत्व सिद्ध केलेले आहे. त्याला या पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदा दिला जाणारा पुरस्कार हा विसावा होता. या पुरस्कारासाठी कामगार पुत्र, लघुउद्योजक, पेपर विक्रेता शिवाजी माजलकर यांची निवड केली जाते. आदर्श श्रमिक पांडुरंग परब आणि आदर्श गृहिणी रुक्मिणी परब यांच्या स्मृतिदिनाचे निमित्त घेऊन हा पुरस्कार दिला जातो. त्याला ज्येष्ठ रंगकर्मी अशोक परब यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे. पत्रकार, लेखक अशोक कदम यांनी लिहिलेल्या ‘काव्य भावना’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन इथे झाले. या पुस्तकाचे मुखपृष्ठ, मांडणी-सजावट रेखाटन चित्रे आणि प्रस्तावना ही पत्रकार नंदकुमार पाटील यांची आहे. या संस्थेच्या वतीने प्रत्येक महिन्याला अभिनव स्पर्धा घेतली जाते. याच महिन्यातील स्मृतिदिनाचे निमित्त घेऊन लेखक, दिग्दर्शक, ज्येष्ठ रंगकर्मी जगतकुमार पाटील यांच्या नावाने ‘प्रगत नाट्यजगत’ ही ७०वी स्पर्धा घेण्यात आली होती. त्याचे परिक्षक म्हणून पत्रकार, नाट्य समीक्षक अरुण घाडीगावकर यांनी काम पाहिले आहे. विपुला पाटील यांचे मार्गदर्शन या स्पर्धेला लाभले. “शिल्पा कट्टी हे या स्पर्धेच्या समन्वयक आहेत. उपस्थित प्रेक्षकांनी आवर्जून अंतर्मुख व्हावे असा एक उपक्रम या अभियान सन्मानमध्ये होतो. ज्या प्रज्ञावंतांनी महाराष्ट्राचे नाव उज्वल केले अशा प्रज्ञावंताला प्रत्यक्ष कलाकृती सादर करून आदरांजली वाहिली जाते.लेखक, दिग्दर्शक अनंत माने त्यांचे मे महिन्यातील स्मृतिदिनाचे निमित्त घेऊन त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सांगते ऐका’ या चित्रपटात ‘बुगडी माझी सांडली गं’ या गाण्यावर नृत्य अदा पेश करून त्यांना नृत्यांजली वाहिली आहे. नृत्यांगना, नृत्य दिग्दर्शिका सावरी मडव या नृत्याच्या सादरकर्त्या होत्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्लेषा परब यांनी केले असून ‘दखलपत्र’ वाचण्यासाठी कौस्तुभ गोसावी, अस्मिता नामजोशी, सुधाकर आवटे, रत्ना साळुंखे या कलाकारांना निमंत्रित केले होते. सविता जाधव, प्रिया राजपुरकर, लेखा तोरसकर यांचा सुद्धा या कार्यक्रमात सहभाग होता. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्य मंदिर, चौथा मजला, चित्रकला दालन, प्रभादेवी येथे हा कार्यक्रम झाला. पत्रकार नंदकुमार पाटील हे या संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष आहेत तर नंदिनी पाटील या संचालिका आहेत.
