वस्त्रनगरी वृत्तसेवा / विक्रम खांडेकर
इचलकरंजी : मुंबई पोलिस दलातील सुरज नेमिनाथ भबिरे याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली आहे.जलद प्रतिसाद पथक पश्चिम प्रादेशिक विभाग (क्यू आर टी )बांद्रा वेस्ट येथे सुरज कार्यरत आहे.नुकत्याच झालेल्या परिक्षेत त्यांची निवड झाली.सुरज इचलकरंजीचे असून निवडीनंतर त्यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली.विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
