एक राखी भारतीय जवानांसाठी

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदूर यांच्याद्वारे एक राखी भारतीय जवानांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमात 250 राखी व जवानांसाठी 250 भावस्पर्शी पत्र विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केली होती. कोल्हापूर येथील मराठा लाईफ इन्फंट्री बटालियन कोल्हापूर येथे जाऊन विद्यार्थ्यांनीनी जवानांना राख्या बांधल्या तसेच भावस्पर्शी पत्र सैनिकांना सुपूर्त करण्यात आली .

सुभेदार मेजर श्री. संतोष सकुंडे, सुभेदार श्री. उमेश वळगटे यांच्या परवानगीने हा उपक्रम साजरा करण्यात आला. या उपक्रमासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.श्री. अभयकुमार साळुंखे, सचिवा सौ. शुभांगीताई गावडे, CEO श्री. कौस्तुभ गावडे, कोल्हापूर विभागप्रमुख श्री. राम साळुंखे , आजीव सेवक श्री. बी. एस. कुंभार यांची प्रेरणा लाभली. विद्यालयातील विज्ञानशिक्षिका सौ. अश्विनी शशिकांत कुंभार यांनी राख्या व पत्र तयार करण्यास विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले सदर उपक्रम विद्यालयात राबवून घेतला. या उपक्रमाने विद्यालयातील सर्व मुली यांना आर्मी विषयी थोडीशी माहिती मिळाली व जवानांना भेटण्याची संधी मिळाली याचे समाधान सर्व विद्यार्थिनींना मिळाले उपक्रमावेळी मुख्याध्यापक श्री. साठे जी. ए एस. व श्री. हराळे के. एस. उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *