नवस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : दत्ताजीराव कदम एएससी कॉलेज मध्ये एन सी सी विभागात खंडेनवमी निमित्त शस्त्रपूजन करण्यात आले.महाविद्यालयात प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही विधिवत शस्त्रपूजन करण्यात आले.माजी एन सी सी ऑफिस मेजर एम जे वीरकर सरांनी घालून दिलेली शस्त्रपूजनाची परंपरा लेफ्टनंट विनायक भुई यांनी सुरू ठेवली.अत्यंत देखण्या पद्धतीने हत्यारांची मांडणी करून प्राचार्य डॉ एस के खाडे यांनी पूजन केले.शिवाजी नगर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनीही भेट देऊन पूजन केले.यावेळी प्रा रोहित शिंगे उपस्थित होते.
