ममतामयी राधे माँ जींच्या आशीर्वादाने दुर्गाष्टमी पूजेत भरला भक्तीचा आणि देशभक्तीचा रंग

वस्त्रनगरी वृत्तसेवा / बाबा लोंढे

मुंबई : दुर्गाष्टमीच्या पावन दिनानिमित्त यंग स्टार कमिटीच्या वतीने अल्टामाउंट रोड, मुंबई येथे भव्य पूजेचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यासाठी सिद्धिविनायक मंदिराचे ट्रस्टी राजाराम देशमुख यांनी खास आमंत्रित केले ,ममतामयी राधे माँ जींच्या दिव्य उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिकच मंगलमय झाला.

राधे माँ जींनी माँ दुर्गेच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व भक्तांच्या आरोग्य, समृद्धी व आनंदासाठी प्रार्थना केली. या पवित्र प्रसंगी मोठ्या संख्येने आलेल्या भक्तांनी आपले मस्तक झुकवून राधे माँ जींना प्रणाम केला. माता जींनी “भारत माता की जय” चा जयघोष करताच वातावरणात देशभक्तीची उर्जा आणि भक्तिभाव संचारला.

माता जींच्या आशीर्वादाने सभोवताली सकारात्मक ऊर्जा पसरली आणि उपस्थित सर्वजण आनंदाने व भक्तिभावाने भारावून गेले. राधे माँ जींनी भारतीय क्रिकेट संघालाही आगामी सामन्यातील विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी गुणी गायक व संगीत दिग्दर्शक नीरज तिवारी यांनी माँ रानीस समर्पित केलेले भक्तिगीत सादर केले आणि वातावरण अधिकच आध्यात्मिक व भक्तिमय केले.

यंग स्टार कमिटी आयोजित दुर्गाष्टमी पूजा ही श्रद्धा, भक्ती आणि सांस्कृतिक उत्साहाचा संगम ठरून भक्तांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *