श्रद्धा इन्स्टिट्यूटचा प्रणव बागरेचा जेईई मेन्स परीक्षेत 99.99 टक्के मिळवत राष्ट्रीय गुणवत्ता यादीत 17 वे स्थान पटकाविला

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : जेईई मेन्स 2026 चा अंतिम निकाल दिनांक 22/04/2026 रोजी जाहीर झाला असून या निकालात श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंटच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवत अग्रेसर निकालाची परंपरा कायम ठेवली. अभिमानाची गोष्ट म्हणजे प्रणव बागरेच्या या विद्यार्थ्याने 99.99% मिळवत संपूर्ण भारत देशात 17 वे स्थान प्राप्त केले तसेच या विद्यार्थ्यांने मॅथ्स मध्ये 100 पर्सेंटाइल मिळवले आहे . याचबरोबर पाटील सोहम 99.90, चौधरी धैर्य 99.85, कोरे प्रणव 99.77, म्हेत्रे मनस्वी 99.76, सस्ते पियुष 99.75, जहागीरदार आशिष 99.72, तोतला श्रेष्ठ 99.69, कापडी अथर्व 99.58, नवले अनुज 99.53, नलावडे सायली 99.45, पाटील समृद्धी 99.37, दाते अभेद्य 99.29, साखरे पृथ्वीराज 99.24, खोत मानसी 99.23, शेख सुहान 99.23, भुइंगडे सोमनाथ 99.9, कदम नीलभ 99.8, तोतला मयंक 99.7, कदम अजिंक्य 99.7, अडसूळ हर्षल 99.3, गंगराडे श्रेया 99.3, पाटील अथर्व 98.7 (फिजिक्स 100% ile ) या सर्व विद्यार्थिनी अभूतपूर्व यश संपादन करीत संस्थेचा नावलौकिक वाढवला तसेच जेईई ऍडव्हान्स 2026 साठी 130 हून अधिक विद्यार्थी पात्र ठरले. एकाच ब्रँच मधून एवढ्या मोठ्या प्रमाणात लागलेला निकाल श्रद्धाचे शैक्षणिक क्षेत्रातील वर्चस्व सिद्ध करतो. या गुणवंत विद्यार्थ्यांचा इन्स्टिट्यूटच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष श्री. ए .आर.तांबे, समन्वयक,श्री.एम.एस पाटील, समन्वयिका सौ.सुप्रिया कौंदाडे, सौ. संगीता पवार, श्री.अभिषेक तांबे, सौ.सृष्टी तांबे तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *