वस्त्रनगरी वृत्तसेवा / विक्रम खांडेकर
इचलकरंजी : महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी २८ जून ला सारंगी व बासरीची जुगलबंदी रंगणार आहे.सायंकाळी ५ वाजता श्रीमंत न. बा.घोरपडे नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार असून सर्वांच्यासाठी मोफत असणार आहे.
देशातील नामवंत बासरी वादक पंडित विवेक सोनार व सारंगीवादक उस्ताद साबीर खान यांचा जुगलबंदी कार्यक्रम असून त्या इचलकरंजीतील नृत्यांगना सायली होगाडे आणि त्यांच्या ३० महिला सहकारी नृत्यांगना यांचा बॉलीवूड थीमवर आधारित नृत्यारंग कार्यक्रम सादर करणार आहेत. शहरवासीयांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी केले आहे.

ICH 09 Youtube channel वर live प्रक्षेपण
या संपूर्ण कार्यक्रमाचे live प्रेक्षेपण ICH 09 या Youtube चॅनल वरून करण्यात येणार असून शहरवासीयांना घरात बसूनही या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे.
