वस्त्रनगरी वृत्तसेवा / विक्रम खांडेकर
इचलकरंजी : श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने ‘एक राखी आपल्या पत्रकार बांधवांसाठी’ हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.इचलकरंजी शहरातील पत्रकारांचे औक्षण करून विद्यार्थिनींनी राखी बांधली.हायस्कूलच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात नुकताच रक्षाबंधनाचा सण पार पडला या सणाचे अवचित्य साधून विद्यार्थिनींनी प्रेमाने कौशल्य गुरव तयार केलेल्या राख्या शहरातील पत्रकार बांधवांना बांधून बंधुत्वाचा सन्मान व्यक्त केला.

या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्व पत्रकारांनी कौतुक केले.अरुण काशीद,अतुल आंबी,पंडित कोंडेकर,शरद सुखटणकर,पांडुरंग पिळणकर,सुनील मनोळे,सुभाष भस्मे, बाबासाहेब राजमाने,हुसेन कलावंत,विक्रम खांडेकर,अंकुश पोळ,शाम संजापुरे,या कार्यक्रमात उपस्थित सर्व पत्रकारांचा संस्थेचे विश्वस्त अहमद मुजावर ,मुख्याध्यापिका ए.एस. काजी,उपप्राचार्य व्ही.जी.पंतोजी, पर्यवेक्षिका व्ही.एस.लोटके, एस. एस. कोळी या सर्वांच्या हस्ते सन्मानचिन्ह,सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

अहमद मुजावर म्हणाले , अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये उत्साह निर्माण होतो. शैक्षणिक गुणवत्तेसह सामाजिक भान वाढविण्यासाठी असे कार्यक्रम उपयुक्त ठरतात. पत्रकार समाजातील घडामोडी जनतेपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य करत असल्याने त्यांचे ऋण व्यक्त करणे आवश्यक आहे.जेष्ठ पत्रकार रामचंद्र ठिकाणे यांनी पत्रकारांच्या वतीने मनोगत व्यक्त केले.अभिजीत पटवा आणि अरुण वडेकर यांनी विद्यार्थिनींना पेन भेट दिले.कार्यक्रमाचे आयोजन,रिटा रॉड्रीग्यूस,डी डी कोळी, क्रीडा प्रमुख बी.एस.माने माने आदींनी केले.

