वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : महापालिकेने यापूर्वी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व २७ ऑगस्ट संवत्सरी या दिवशी शहरातील मांस व मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर बंदीचा आदेश दिला होता. मात्र, नागरिकांच्या जनभावना व स्थानिक परिस्थितीचा विचार करून, १५ ऑगस्ट २०२५ (स्वातंत्र्य दिन) रोजी मटण दुकाने व कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. याबाबतची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
