इचलकरंजी पंचगंगा नदी पात्रात मगरीचे दर्शन

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : आपत्ती व्यस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांना येथील पंचगंगा नदीच्या पात्रात रविवारी मगरीचे दर्शन झाले.मोठ्या मगरी बरोबरच त्याची लहान लहान पिले असल्याचेही सांगण्यात येत आहे.व्यवस्थापन समितीचे कर्मचारी रविवारी पंचगंगा नदीत एक व्यक्ती बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचा दिवसभर शोध घेत होते. सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान काळया ओढ्याचे पाणी जेथे पंचगंगा नदीत मिसळते त्या जवळ बेडक्याळे यांचे शेत आहे.पूर्व दिशेला असलेल्या शेताजवळ मगरीचे लहान पिल्लू नदीपात्रात येत असल्याचे आपत्ती व्यवस्थापन मधील कर्मचाऱ्यांना दिसले. त्यांनी आपली बोट आणखी पुढे घेतली असता मोठी मगर नदी पात्रा लगत बसल्याचे दिसून आले.बोट जवळ घेतल्यानंतर मगर पंचगंगा नदीच्या पाण्यात गेली. संजय कांबळे,हरीष कांबळे,देवानंद कांबळे,शाक्यानंद कांबळे,शितल ज्योती,अविनाश काकडे आदींना मगर दिसली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *