सुळकुड पाणी योजनेच्या विलंबाविरोधात इचलकरंजीत महाविकास आघाडीची कावड यात्रा

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : इचलकरंजी शहर महाविकास आघाडीच्या वतीने सुळकुड पाणी योजनेच्या विलंबाविरोधात अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र सरकारच्या विद्यमान आमदार व खासदार यांच्या हस्ते मंजूर झालेल्या या योजनेच्या अंमलबजावणीत होत असलेल्या दिरंगाई व चालढकल याबाबत सर्वांना सद्बुद्धी यावी, यासाठी लोकमान्य टिळक पुतळा, राजवाडा येथून कावड यात्रेला सुरुवात करण्यात आली.यात्रेचा समारोप ग्रामदैवत श्री शंभू महादेव मंदिर, गावभाग येथे सुळकुड पाण्याचा अभिषेक घालून करण्यात आला.

यावेळी श्री. मदनराव कारंडे, संजय कांबळे, सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, सयाजी चव्हाण, भरमा कांबळे, सदा मलाबादे, वसंत कोरवी, उदयसिंह पाटील, हेमंत वनकुंद्रे, बाबासाहेब कोतवाल, राजू आलासे, मालकरी लवटे, नंदकिशोर जोशी, युवराज शिंगाडे, योगेश कांबळे, नागेश शेजाळे, अभिजीत रवंदे, अण्णा कांबळे, राजू किनेकर, राजन मुठाणे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सदर कावड यात्रेचे नियोजन नगरसेवक अमरजीत जाधव यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *