वस्त्रनगरी वृत्तसेवा/विक्रम खांडेकर
इचलकरंजी : कलानगर गणशोत्सव मंडळाच्यावतीने यंदा १ हजार हत्तींच्या प्रतिकृतींचा समावेश असलेला भव्यदिव्य असा `गजमहल` देखावा साकारण्यात येत आहे. सहा हजार स्क्वेअर फुट जागेमध्ये ही काल्पनीक प्रतिकृती उभारण्यात येत असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.पश्चिम महाराष्ट्रात नावीन्य पूर्ण कलेचा हा नमुना असणार आहे.
राजहंस पक्षी : गजमहालाच्या मध्यभागी 20 बाय 40 फुटाचा भव्य जलकुंड साकारण्यात येत आहे .तुम्हाला आश्चर्य वाटेल 50 हजार लिटर पाणी आणि अंतर्गत भागात जलकुंडाची उभारणी करण्यात येत असून त्यात राजहंस पक्षाचे दर्शन होणार आहे. त्यामुळे एक वेगळी अनुभूती मिळणार आहे.या महलाच्या प्रत्येक खांबाजवळ फायबरचे सुमारे साडे तीनशे मोठे हत्ती असणार आहेत तर कमान,पिलर यांच्यावरही हत्तीच हत्ती दिसणार आहेत.

गेल्या वर्षी या मंडळाच्या माध्यातून `शिशमहल` साकारण्यात आला होता. त्याला गणेश भक्तांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. यंदाही भव्य दिव्य कलेची परंपरा मंडळाने कायम राखली आहे. ३५ फुट उंच अशा `गजमहल` मंदिरात `कलानगरचा महागणपती` विराजमान होणार आहे. गेल्या कांही दिवसांपासून या कलाकृतीवर काम सुरु आहे. येथे येणा-या गणेश भक्तांची गैरसोय होवू नये, यासाठी चप्पल स्टॅन्डपासून ते प्रसाद, पाणी याची विशेष व्यवस्था असणार आहे.अशी माहिती अध्यक्ष सचिन तोडकर यांनी आज पत्रकारांना दिली. यावेळी रमाकांत वाळवेकर, प्रशांत सपाटे, सुनिल तोडकर, अभिषेक वाळवेकर आदी उपस्थीत होते.
धार्मिक कार्यक्रम : विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये मंगल आरती, मंत्रपुष्पांजली, महिलांसाठी सामुहिक अथर्वशीर्ष पठण, शहाळांची महापुजा, श्री गणेशयाग, वारकरी भजन, शास्त्रीय रागसाधना, वाद्यवंदना, उत्सवमुर्तीचा पालखी सोहळा, स्वराभिषेक कार्यक्रम, पुष्प महोत्सव यांचा समावेश आहे.
चार महिने काम सुरू : गजमहाल ची प्रतिकृती उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे.30 ते 40 कारागीर एप्रिल म्हणजे गेल्या चार महिन्यांपासून उभारण्याचे अविरत काम करत आहेत. जमिनीपासून 35 फूट उंचीचा 60 फूट रुंद आणि 100 फूट लांबीचा भव्यदिव्य गजमहाल उभारण्याचे काम रात्र आणि दिवस सुरू आहे.6 हजार स्क्वेअर फूट एरियाकल्पकतेची उच्च प्रतीची जोड दिली आहे.
