वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभाग व निवडणूक आयोगाच्या आदेशा प्रमाणे इचलकरंजी शहर महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना गुरुवारी 4 सप्टेंबर 2025 रोजी जाहीर झाली. सदर प्रभाग रचनेचे प्रारूप आराखडा इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनाणे 11 ऑगस्ट 2025 रोजी शासनाकडे दाखल केला. प्रारूप प्रभाग रचना दाखल केल्यानंतर इचलकरंजी शहरात सदर प्रभाग रचना सत्तेतील पक्षाच्या सोईचे झाल्याचे वातावरण तयार केले गेले. तथापी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेचा आढावा घेतला असता झालेली प्रभाग रचना हि महाविकास आघाडीच्या दृष्टीकोणातून अतिशय चांगली झाली असून महानगरपालिकेच्या निवडणूकी नंतर महाविकास आघाडी निश्चितच सतेत पोहचेल असा विश्वास महाविकास आघाडीच्या प्रमुखांनी व्यक्त केला. या बैठकीस महाविकास आघाडीचे प्रमुख मदन कारंडे, शशांक बावचकर, सागर चाळके, संजय कांबळे, राहूल खंजिरे, सयाजी चव्हाण, प्रकाश मोरबाळे, अब्राहम आवळे, सदा मलाबादे, हारून खलिफा, शिवाजी साळुंखे, सुनील बारवाडे, यांचेसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. असे महाविकास आघाडीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
