शक्तीपीठ आंदोलन… राजू शेट्टी,विजय देवणे,रुतुराज पाटील, राजु आवळे यांच्यासह 400 जणांच्यावर गुन्हे दाखल

Oplus_16777216

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : शक्तीपीठ विरोधात आंदोलन करून राष्ट्रीय महामार्ग आडवल्याप्रकरणी 400 जणांच्यावर गुन्हे दाखल गुन्हे दाखल झालेल्या मध्ये १.राजु देवाप्पा शेटटी, माजी खासदार अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना,रा. शिरोळ ता. शिरोळ,२. विजय शामराव देवणे, जिल्हा अध्यक्ष शिवसेना उ.बा.ठा. गट, रा. देवणे गल्ली, मंगळवार पेठ कोल्हापूर,३. सचिन प्रल्हाद चव्हाण, कॉग्रेस पदाधिकारी रा. कोल्हापूर,४. विक्रात विजय उर्फ अशोक पाटील, जिल्हा समन्वयक एरिगेशन फेडरेशन रा.शिवाजी पार्क कोल्हापूर,५. बाबासाहेब विष्णु देवकर रा. गाडेगोंडवाडी ता. करवीर, शे.का.प..६. कॉ. रघुनाथ कांबळे रा. कदमवाडी, कोल्हापूर,७. कॉ. शिवाजी मगदुम रा. सिध्दनेलीं ता. कागल,८. अजित बाबुराव पोवार रा. टिटवे ता. राधानगरी,९. विक्रम पाटील रा. जैनापुर ता. शिरोळ,१०. अविनाश अनिल कडोले रा. निमशिरगांव ता. शिरोळ,११. डॉ. बाबासो पाटील, रा. बेलवळे ता. कागल,१२. रुतुराज संजय पाटील माजी आमदार रा. कसबा बावड कोल्हापूर,१३. राजु जयवंतराव आवळे, माजी आमदार रा. इचलकरंजी,१४. रविकिरण विष्णुपंत इंगवले, जिल्हा अध्यक्ष शिवसेना उ.बा.ठा.गट,रा. शिवाजीपेठ कोल्हापूर,१५. प्रविण दत्तात्रय पाटील रा. जिवबानाना पार्क कोल्हापूर,१६. निशीकांत गिरीधर पाटील रा. कणेरीवाडी ता. करवीर,

१७. प्रकाश रामचंद्र पाटील रा. नेलीं ता. करवीर,१८. सुभाष देसाई रा.सम्राट नगर राजारामपूरी, कोल्हापूर,१९. दिग्वीजय दिलीप मगदुम रा. संभाजीनगर कोल्हापूर,२०. सुयोग दिलीप मगदुम रा. संभाजीनगर कोल्हापूर,२१. संग्राम गोपाळ पाटील रा. पाचगांव ता. करवीर,२२. युवराज धोंडीराम गवळी रा. पाचगांव ता. करवीर,२३. आकाश जनार्दन भास्कर रा. कुडीत्रे ता. करवीर,२४. रावसाहेब उर्फ रघुनाथ खंडेराव पवार रा. महाराणा प्रताप चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर,२५. अतुल प्रसन्नकुमार दिघे, रा. सानेगुरुजी वसाहत कोल्हापूर,२६. राजेंद्र शामराव गडडेनवार रा. गडहिंग्लज,२७. आशिष शरदराव पाटील रा. मोरेवाडी ता. करवीर,२८. रणजितसिंह कुसाळे रा. वळीवडे ता. करवीर,२९. मोहन रामचंद्र सालपे रा. माळगल्ली, कसबा बावडा, कोल्हापूर,३०. राजु भरत लाटकर रा.लिशा हॉटेल, कोल्हापूर वइतर ३५० ते ४०० पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा समावेश आहे.जिल्हादंडाधिकारी, कोल्हापूर यांनी बंदी आदेश लागु केला असताना शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समिती, कोल्हापूर यांनी १ जुलै रोजी सकाळी ११.१५ ते दुपारी १.१० वाजे पर्यंत. बालेचाँद पिर दर्यासमोर पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर एकजमाव करुन पुणे बेंगलोर व बेंगलोर पुणे महामार्ग रस्त्यावर जाऊन बसले आणि त्यांनी “शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे”, “जमीन आमचे हक्काची, नाही कोणाचे बापाची”, “या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय”, “शेतकरी एकजुटीचा विजय असो” अशा घोषणा देत, पुणे बेंगलोर महामार्ग रस्ता आडवून धरला. महामार्गावरील येणारे जाणारे वाहने व त्यातील नागरिक यांना येण्याजाण्यास अटकाव केला व वाहतुक बंद पडल्याचे दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *