वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी ” अंगणी विठूच्या राम कृष्ण हरी बरसू दे ” या गीताच्या माध्यमातून वारीला गेल्याची अनुभूती येते. एखाद्या चित्रपटाचा भाग होईल इतक्या सुंदर गीताची निर्मिती करण्यात आली आहे असे प्रतिपादन महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी केले.सुप्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांनी गायलेले ए के प्रोडक्शन निर्मित आठवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस येत असून त्याचे प्रकाशन आयुक्त पल्लवी पाटील, उप विभागीय अधिकारी दीपक शिंदे,अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे कोल्हे,मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास कोळपे यांच्या हस्ते झाले.

त्यावेळी आयुक्त पल्लवी पाटील बोलत होत्या.आयुक्त पाटील म्हणाल्या,शहराला मोठी सांस्कृतिक परंपरा आहे.या शहरात अनेक कलाकार आहेत.त्यांच्या माध्यमातून कला क्षेत्र दमदार वाटचाल करीत आहे.दीपक शिंदे म्हणाले,इचलकरंजी शहरातून एक सुंदर गाणे विठूरायाच्या चरणी समर्पित होण्यासाठी तयार झाले आहे.सुषमा शिंदे म्हणाल्या,नवनिर्मिती करणे सोपे नाही मात्र विठ्ठल गीताच्या माध्यमातून ए के प्रोडक्शनने ती नवनिर्मिती साध्य केली आहे.

प्रारंभी विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.गाण्याचे दिग्दर्शन सुमित साळुंखे यांनी केले आहे तर याला मिलिंद गवेकर यांनी संगीत दिले आहे. मिक्सिंग आणि मास्टरिंग ऋषिकेश ठाकुर देसाई, राधिका डिजिटल होगाडे जॉबर यांनी केले आहे.याचे संकलन राज साबळे ड्रीमलाईट स्टुडिओ यांनी केले असून चित्रीकरण सुमित मालवणकर,विक्रम खांडेकर,पवन गिरंगे यांनी केले आहे.यात सुमित डान्स अकॅडमी सांगलीच्या कलाकारांनी नृत्याचे काम केले आहे. निर्माते आणि गीता लेखन करणारे अरुण काशीद यांनी स्वागत केले.सूत्रसंचलन रोहित शिंगे यांनी केले आहे.आभार सुमित साळुंखे यांनी मानले.यावेळी अपर तहसीलदार सुनील शेरखाने,मधुकर मुसळे, विद्यासागर चराटे,अल्पेश गोगड,राहुल निमणकर,अनिल डांगरे आदी उपस्थित होते.


