वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : मागील गाळप हंगामातील दोनशे रुपये व चालू हंगामासाठी 3750 रुपये घेतल्याशिवाय ऊसतोड द्यायची नाही असा निर्धार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.चालू हंगामासाठी वेगवेगळ्या साखर कारखान्याने ऊस दर जाहीर केला आहे. जाहीर केलेल्या दारावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी शहापुरे फॉर्म हाऊस येथे शेतकऱ्यांची बैठक होती. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक अण्णासाहेब शहापुरे यांनी केले. तर आर. के. पाटील, बाळासाहेब पाटील, सतीश मगदूम, भीमगोंडा पाटील, निवृत्ती शिरगुरे, शितल देवमोरे, संजय बेडकळे आदींनी मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये अनेक मान्यवरांनी यंदा उसाचे क्षेत्र कमी असल्याने ऊसाला चांगला भाव येणार आहे. तेव्हा ऊस तोडणी करताना कोणतीही गडबड करू नये. तोडणी, वाहतूकदारांना पैसे देऊ नये तसेच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच शेतकऱ्यांनी आपली एकी दाखवावी असे आवाहन केले. बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बसगोंड बिरादार, सतीश मगदूम, हेमंत वनकुंद्रे, कुबेर बेडकाळे, बाबुराव दरीबे, शिवगोंडा पाटील, अण्णा बेडक्याळे, बापू पाटील, रामा शेळके, भाऊसो रुग्गी, सदाशिव मिरजे, अनिल देवमोरे, सुनील गोंधळी, विष्णू साळुंखे, सागर पाटील, राजू येलाज यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
