डी के ए एस सी महाविद्यालयाच्या योगा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय योगा स्पर्धा इचलकरंजी येथील योग भवन येथे संपन्न झाल्या. डी के ए एस सी महाविद्यालयाच्या हर्षदा करंबेळकर व शर्वरी माळी या योगा खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली.हर्षदा करंबेळकरणे ट्रॅडिशनल योगा स्पर्धेत गोल्ड मेडल. तसेच रीदमिक खेळ प्रकारात हर्षदा करंबेळकर व शर्वरी माळी या जोडीने गोल्ड मेडल मिळवले. त्याचप्रमाणे शर्वरी माळी या खेळाडूने आर्टिस्टिक सोलो खेळ प्रकारामध्ये गोल्ड मेडल मिळवले व आर्टिस्टिक मध्ये पेअर करून या योगा खेळ प्रकारातील स्पर्धेमध्ये देखील गोल्ड मेडल मिळवले. त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस के खाडे यांनी खेळाडूंचे या यशस्वी कामगिरीबद्दल अभिनंदन केले. क्रीडा संचालक प्रा. विनायक भोई, प्रा. मुजफ्फर लगीवाले यांचे मार्गदर्शन मिळाले तर श्री सुहास पवळे यांचे प्रशिक्षण मिळाले. खेळाडूंना पुढील कामगिरीसाठी महाविद्यालयाचा प्राध्यापक व प्रशासकीय स्टाफ तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *