वस्त्रनगरी वृत्तसेवा / विक्रम खांडेकर
इचलकरंजी : महानगरपालिका निवडणूक प्रभाग रचनेत पारदर्शकता ठेवावी असे निवेदन महाविकास आघाडी च्या वतीने आयुक्त पल्लवी पाटील यांना देण्यात आले.महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे देण्यात आलेले आहेत. त्यास अनुसरून महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने 12 जून 2025 रोजी प्रभाग रचना करणे बाबत कालबद्ध कार्यक्रम जाहीर केलेला आहे.शासनाच्या आदेशाप्रमाणे होणारी प्रभाग रचना ही कोणत्याही राजकीय दबावाखाली व लोकप्रतिनिधींच्या सूचनेनुसार करण्यात येऊ नये.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या एकूणच घोळावर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याचे कोणातेही उत्तर निवडणूक आयोगाने अद्यापही दिलेले नाही. तोच प्रकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये होऊ नये असे अपेक्षित आहे. महाराष्ट्र शासनाच्या दिलेल्या निर्देशामध्येही याबाबीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. यास्तव प्रभाग रचना करण्याची मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आलेली आहे. अयोग्य प्रकारे प्रभाग रचना केली गेल्याने अनेक रिट याचिका यापूर्वी माननीय उच्च न्यायालयात दाखल झालेचेही शासनाच्या निर्देशात म्हटले आहे.असे निवेदन देण्यात आले आहे.यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव शशांक बावचकर,सागर चाळके,प्रकाश मोरबाळे,उदयसिंग पाटील,सयाजी चव्हाण आदी उपस्थित होते.
