अभिनेते अमोल पालेकर यांचा नाफा जीवन गौरव पुरस्कारने सन्मान

वस्त्रनगरी वृत्तसेवा/बाबा लोंढे

सॅन होजेअमेरिका : नॉर्थ अमेरिकन फिल्म असोशिएशन’च्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘नाफा जीवन गौरव पुरस्काराने’ जेष्ठ अभिनेते, दिग्दर्शक अमोल पालेकर यांना सॅन होजेतील ‘द कॅलिफोर्निया थिएटर’मध्ये ‘नाफा ग्लॅमरस फिल्म अवार्ड नाईट’ या भव्य आणि दिमाखदार कार्यक्रमात गौरवण्यात आले.महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार आणि नाफाचे संस्थापक अभिजीत घोलप यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.मधुर भांडारकर यांच्यासह डॉ. मोहन आगाशे, सचिन खेडेकर, महेश कोठारे, अश्विनी भावे, सोनाली कुलकर्णी, स्वप्नील जोशी, अवधूत गुप्ते, आदिनाथ कोठारे, वैदेही परशुरामी यांचाही ‘नाफा फिल्म अवार्ड नाईट’मध्ये विशेष गौरव

अमोल पालेकर म्हणाले, “माझा हा सन्मान केलात, गौरव केला याबद्दल नाफाचे, अभिजीत घोलप आणि तुम्हा सर्व रसिकप्रेक्षकांचे मनापासून आभार. काही वर्षांपूर्वी गौरी देशपांडेंच्या कथेवर बेतलेला सिनेमा करण्याची तयारी मी सुरु केली होती. त्या सिनेमामध्ये निकोल किडमन आणि अमिताभ बच्चन या दोघांना घेऊन मराठी सिनेमा बनविण्याचे माझे स्वप्न होते.

संस्थापक अध्यक्ष अभिजित घोलप म्हणाले, “यंदाचा नाफा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना विशेष आनंद होत आहे. पालेकरांच्या हळुवार, खुसखुशीत रोमँटिक भूमिकांनी आणि त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने तमाम भारतीय प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान आहे. जुबिलीस्टार अशीही त्यांची ओळख भारतीय चित्रपटसृष्टीत आहे, अश्या महान कलावंताचा हा सन्मान अमेरिकेतील तमाम मराठी रसिकांच्या हृदयातून, आपलेपणाने केला जात आहे. पालेकरांनी हा सन्मान स्वीकारून ‘नाफा’चाच सन्मान वाढविला आहे.

नाफाच्या फिल्म अवार्ड नाईटची मध्ये स्वप्नील जोशी वैदेही परशुरामी, आदिनाथ कोठारे, अमोल पालेकर, संध्या गोखले, सोनाली कुलकर्णी तिच्या मुलीसह, अश्विनी भावे, सचिन खेडेकर, गजेंद्र अहिरे, महेश कोठारे, डॉ. मोहन आगाशे आणि मधुर भांडारकर महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *