जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त डॉ. जे. जे. मगदूम होमिओपॅथिक कॉलेजमध्ये विविध उपक्रमांची रेलचेल

वस्त्रनगरी वृत्तसेवा

जयसिंगपूर : १० एप्रिल २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या ‘जागतिक होमिओपॅथी दिना’निमित्त तसेच होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युएल हॅनिमन यांच्या २७१ व्या जयंतीनिमित्त येथील डॉ. जे. जे. मगदूम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये दि. १ एप्रिल ते ११ एप्रिल २०२६ या कालावधीत विविध शैक्षणिक, वैद्यकीय आणि समाजाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.होमिओपॅथी उपचारपद्धतीबाबत जनजागृती करणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक कौशल्यांना चालना देणे तसेच समाजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे.

दि. १ एप्रिल रोजी सर्जनशील व जनजागृती स्पर्धा (शॉर्ट व्हिडिओ, लेख/कविता, फ्लेक्स व रांगोळी) आयोजित करण्यात आल्या असून क्लिनिकल केस प्रेझेंटेशन आणि ‘यंग प्रॅक्टिशनर अचिव्हमेंट अवॉर्ड’चे वितरणही करण्यात येणार आहे.

दि. २ एप्रिल रोजी ॲनिमिया व ऑस्टिओआर्थ्रायटिस विषयक आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर तसेच वजन व्यवस्थापनाबाबत जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

दि. ३ एप्रिल रोजी योग तज्ज्ञांद्वारे ‘योगावरील विचारप्रवर्तक चर्चा’ होणार असून

दि. ४ एप्रिल रोजी ताण व्यवस्थापन व सामाजिक दबाव या विषयांवर तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. १. एडीएचडी (ADHD) विषयावरील सत्र वक्ते: डॉ. मोनाली कुलकर्णी २. मानसिक आरोग्य – ताण-तणाव व्यवस्थापन वक्ते: डॉ. आरती कोगनोळे ३. मानसिक आरोग्य – सामाजिक दबाव वक्ते: डॉ. प्रणव निमणकर,याच दिवशी प्रेस कॉन्फरन्स व मीडिया संवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. १० एप्रिल रोजी ‘होमिओ मॅरेथॉन’द्वारे नागरिकांमध्ये निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात येणार आहे.

दि. ११ एप्रिल रोजी डॉ. बजरंग भोसले यांचे क्लिनिकल व पॅथॉलॉजिकल केसेसवर मार्गदर्शन होणार असून विद्यार्थ्यांना अनुभवाधारित ज्ञान मिळणार आहे.

या सर्व उपक्रमांद्वारे होमिओपॅथी उपचारपद्धतीची प्रभावीता अधोरेखित करणे, मानसिक आरोग्य व जीवनशैलीशी संबंधित आजारांबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच समाजाशी दृढ नाते निर्माण करणे हा महाविद्यालयाचा उद्देश असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हाईस चेअरपर्सन डॉ. सोनाली मगदूम व कार्यकारी संचालक डॉ. सुनील आडमुठे यांच्या प्रेरणेतून तसेच प्राचार्य डॉ. सुरेश नायर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *