वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : श्रीमती आर आर पाटील कन्या महाविद्यालय यामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या 199 जयंती निमित्त एन एस एस विभागामार्फत नंदादीप नेत्रालय इचलकरंजी यांचे कडून नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानव दर्शन विचारांचा आणि आधुनिक काळातील समकालीन प्रस्तुतता यावर डॉक्टर सुनील गुरव यांनी दृष्टिक्षेप टाकला तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब दुधाळे हे होते. त्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार आणि त्यांचे भाषेवरील कार्य आजच्या काळाला मार्गदर्शक असे आहेत असे प्रतिपादन केले याप्रसंगी नंदादीप नेत्रालयातील डॉक्टर उत्कर्ष पाखरे डॉक्टर क्षितिजा कुंडू तसेच अंकुश उत्तरे जुबेर ताजपुरे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर धीरज शिंदे यांनी केले एनएसएस चे सर्व सदस्य महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर प्रियांका कुंभार यांनी केले तर आभार स्वाती हळवणकर यांनी केले.

