वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजीच्या गृहविज्ञान विभागामार्फत विस्तार कार्यक्रमांतर्गत आहार व पोषण विषयक मार्गदर्शन शिबिर चंदूर (शाहूनगर) येथील अंगणवाडीत आयोजित करण्यात आले. हा कार्यक्रम दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी पंचायत समिती हातकणंगले यांच्या बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या आमंत्रणानुसार घेण्यात आला.

या कार्यक्रमात गृहविज्ञान विभाग प्रमुख प्रा. संगिता पाटील, प्रा. स्वाती हाळवणकर तसेच बी.ए. भाग-३ च्या विद्यार्थीनींनी अंगणवाडीच्या लाभार्थी गर्भवती स्त्रिया, स्तनदा माता व किशोरवयीन मुलींना आहार, आरोग्य व पोषण विषयक मार्गदर्शन केले. सहभागी महिलांच्या आरोग्यविषयक अडचणी जाणून घेत त्यांच्या अवस्थेनुसार आहाराचे महत्त्व, तसेच योग्य आहाराद्वारे पोषण कसे साध्य करता येते याची माहिती देण्यात आली.सदर कार्यक्रमासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी माननीय सौ. सुप्रिया पोवार (आय.सी.डी.एस. हातकणंगले-२), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब दुधाळे यांचे सहकार्य लाभले. तसेच चंदूर अंगणवाडीच्या पर्यवेक्षिका सौ. स्मृती खांडेकर व सर्व अंगणवाडी सेविकांचे योगदान उल्लेखनीय ठरले.या उपक्रमामुळे लाभार्थी महिलांमध्ये आहार व आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होऊन पोषणाचे महत्त्व अधोरेखित झाले.
