वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेसाठी जशी महापालिका प्रशासनाची धावपळ उडाली आहे.तशीच लगीन घाई राजकीय पक्षात सुरू आहे.महाविकास आघाडी आणि भाजपा या दोन तुल्यबळ पक्षात खरी लढत होणार आहे.पुढील रणनीती आखण्यासाठी महाविकास आघाडीने सोमवारी (२३) आपल्या मित्रपक्षांची काँग्रेस कमिटी मध्ये बैठक बोलावली आहे.
माजी आमदार सुरेश हाळवणकर,प्रकाश आवाडे आणि विद्यमान आमदार राहुल आवाडे यांना टक्कर देण्याची ताकद महाविकास आघाडीतील काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शशांक बावचकर,राहुल खंजिरे,संजय कांबळे,राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव मदन करांडे,ताराराणी पक्षाचे सागर चाळके,प्रकाश मोरबाळे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सयाजी चव्हाण, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदा मलाबादे या नेत्यांच्या कडे आहे.
मात्र या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन करण्याची आखणी केली पाहिजे. यातील प्रत्येक नेत्याचा आपापल्या भागामध्ये धबधबा आहे त्या धबधब्याचा उपयोग जर एकसंघपणे करता आला तर ते भक्कम पडले भाजपला टक्कर नक्कीच देऊ शकतील. महावितरण आघाडीची रणनीती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी सर्वच पक्षांची दिली बैठक काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात सोमवारी होणारा आहे. या बैठकीत कोणता निर्णय होतो याकडे लक्ष लागून राहिले आहे.
