संपादकीय

“वस्त्रनगरी” महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या वस्त्रनगरी इचलकरंजीने विविध क्षेत्रात आपले वेगळे स्थान आणि नाव निर्माण केले आहे.४ लाख लोकसंख्येच्या या शहराने आपले पारंपरिक अस्तित्व जपत नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. वस्त्रोद्योग व इंडस्ट्रियल क्षेत्रातील उद्योजकांनी घेतलेली भरारी कौतुकास्पद आहे.खो खो खेळाची पंढरी म्हणून इचलकरंजीची ओळख आहे.राजकीय क्षेत्र आणि सहकार या माध्यमातून लोकांचा सहभाग करून घेऊन प्रत्येकाच्या हाताला काम दिले आहे.राज्यातील २८ वी महानगरपालिका इचलकरंजीत स्थापन झाली आहे.त्यातून गावचा विकास साधला जात आहे.बदलत्या काळाचे आव्हान स्वीकारून इचलकरंजीचे प्रतिबिंब हे देशात नव्हे तर जगात दिसावे यासाठी आम्ही “वस्त्रनगरी”या दैनिक वेब पोर्टल च्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे.दरोजच्या घडामोडी देण्याबरोबरच विविध क्षेत्रातील विश्लेषण या “वस्त्रनगरी” मधून केले जाईल.याचे सर्वजण स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.

विक्रम खांडेकर

संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *