वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका आयोजित शासकीय कुस्ती खेळाच्या स्पर्धा व्यंकोबा मैदान या ठिकाणी उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाल्या. या झालेल्या स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या पैलवानांनी आपल्याजवळील कौशल्यांचा व डावांचा उत्कृष्टरित्या वापर करत समोरच्या मल्लांवर विजय प्राप्त केला. यामध्ये फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात प्रेम सुवासे 74 की. खालील वजनी गटात प्रथम क्रमांक, करण पवार 79 की.खालील वजनी गटात प्रथम क्रमांक, सत्वशील घोरपडे 86 किलो खालील वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवला. त्याचप्रमाणे ग्रीको रोमन कुस्ती प्रकारामध्ये 79 किलो खालील वजनी गटामध्ये ओम शेळके प्रथम क्रमांक मिळवला. त्यांनी केलेल्या या कामगिरीमुळे या सर्व खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
खेळाडूंनी केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस के खाडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.विनायक भोई, प्रा. मुजफ्फर लगीवाले व प्रबंधक श्री आर बी जोग यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचा प्राध्यापक स्टाफ, प्रशासकीय स्टाफ व विद्यार्थी विद्यार्थिनींनी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
