वस्त्रनगरी वृत्तसेवा / विक्रम खांडेकर
इचलकरंजी : श्रींच्या आगमनाने आज संपूर्ण शहर भक्तिभाव आणि उत्साहात नाहून निघाले. “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात घराघरांत बाप्पाचे आगमन झाले. पारंपरिक ढोल-ताशा, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि फुलांनी सजवलेल्या रांगोळ्यांनी वातावरण बहरून गेलं.आशा वातावरणात वस्त्रनगरीत गणरायाचे स्वागत करण्यात आले.लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.

एक परिवार ,एक पोषाख ची नवी क्रेझ गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी संपूर्ण कुटुंबच पाच सहा दिवस आरास मध्ये गुंतलेले असते.बाप्पाचे स्वागत वेगळ्या पद्धतीने करण्यासाठी आता पोषाखही घेतले जात आहेत. एका कुटुंबाचा किंवा एका परिवाराचा एकच पोषाख असवा यासाठी प्रयत्न केले जात आहेत.शहरातील निक्स सारख्या दुकानातून बाप्पाच्या आगमनासाठी एकसारखा ड्रेस शिवून घेतला जात आहे.या वर्षापासून एक परिवार, एक पोषाख ही नवी क्रेझ रूढ होताना दिसत आहे.
काहींनी पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली तर काहींनी कलात्मक सजावटीतून आपली श्रद्धा व्यक्त केली.या निमित्ताने परिसरात ऐक्य, बंधुता आणि भक्तीचा अद्भुत संगम पाहायला मिळत असून संपूर्ण समाज एकत्र येऊन गणपती बाप्पा मोरया अशा जयघोषांनी गणेशोत्सवाचा उत्सव अधिकच मंगलमय झाला करीत आहेत.ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिश बाजीत आणि विद्युत रोषणाईत, जल्लोषात बाप्पाला आणताना कुटुंबातील एकोप्याची झलक स्पष्ट दिसली.परंपरेसोबत आधुनिकतेचा संगम साधत गणेश गणरायाचे स्वागत करण्यात आले.

सकाळ पासूनच वस्त्रनगरीत ढगाळ वातावरणात होते.अधून मधून पावसाच्या सरी येत होत्या.मात्र तरीही गणेश भक्तांचा उत्साह वाखाणण्याजोगे होता.सकाळी ११ नंतर मोठ्या प्रमाणात नागरिक बाप्पाची मूर्ती आणण्यासाठी बाहेर पडले.त्यामुळे मलाबादे चौक,गांधी पुतळा,स्टेशन रोड,शाहू महाराज पुतळा आदी परिसर गर्दीने फुलून गेला होता.शहरातील बहुतांशी गणेश मुर्त्या गांधी पुतळा चौकात आणून ठेवण्यात आल्या असून सायंकाळ नंतर त्या शहरातील विविध मंडळाकडे मिरवणुकीने प्रस्थान करतील.उत्सवामुळे मोठा पोलिस बंदोबस्त ही शहरात ठेवण्यात आला आहे.

