पर्यावरण पूरक गणेशोत्सव काळाची गरज – प्रा. स्वाती हळवणकर

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : महाराष्ट्राचा राज्य सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाला सांस्कृतिक वैभवशाली परंपरा लाभली आहे. प्रबोधन आणि स्वातंत्र्य चळवळीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या या उत्सवाचे स्वरूप मात्र सध्याच्या काळात पर्यावरणाला हानिकारक ठरत असल्याचे दिसून येते. त्यामुळेच आजच्या तरुण पिढीने पुढाकार घेऊन पर्यावरण पूरक आणि विधायक गणेशोत्सव साजरा करणे ही काळाची गरज आहे, असे मत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सदस्या प्रा. स्वाती हळवणकर यांनी व्यक्त केले.श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब दुधाळे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सामाजिक बांधिलकी जपत विधायक स्वरूपात गणेशोत्सव कसा साजरा करावा यावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमास एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. धीरज शिंदे, डॉ. प्रियांका कुंभार, ज्युनिअर विभागाच्या प्रा. सोनाली बोरगावकर, प्रा. धोत्रे यांच्यासह विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *