इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : महानगरपालिकेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण जून महिन्यात वर्धापन मास आयोजित करण्यात आलेला असून या अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.या अनुषंगाने २१ जून रोजी जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून राजाराम स्टेडियमवर योगासने व झुंबा डान्स करण्यात आला.इचलकरंजी महानगरपालिका, आर्ट ऑफ लिव्हिंग इचलकरंजी, कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषद, इचलकरंजी, पतंजली योग समिती इचलकरंजी, आय. ॲम.फिट. क्लब आणि रिंगण फिटनेस यांच्या सहकार्याने जागतिक योग दिन साजरा करण्यात साजरा करण्यात यामध्ये शहरातील नागरिकांच्या बरोबरच आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे कोल्हे, उपायुक्त नंदू परळकर, आरती खोत, रोशनी गोडे आदींनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *