इचलकरंजीत आज रंगनार सुवर्ण महोत्सवी संमेलन स्मृती जागर

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली १९७४ साली झालेल्या सुवर्णमहोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा स्मृती जागर सोहळा २६ डिसेंबर २०२४ रोजी इचलकरंजीत मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. हा स्मृतीजागर वर्षभर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साहित्यिक उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. यातील ऑक्टोबर महिन्यातील उपक्रम गानमैफलीचा आयोजीत केला आहे.

भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या ८८ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या पूर्वसंध्येला अवीट गाण्यांची
” गानमैफल”
सादरकर्ते : मा. आशुतोष कुलकर्णी व सहकारी ( पुणे)

कार्यक्रम क्र. १०

वेळ : शनिवार ता.२५ ऑक्टोबर २०२५ सायं.५ वाजता

स्थळ: दिलीप शेंडे ,स्वानंदी ,८/१६१६ , शहापूर रोड ,सांगली नाका, स्टेट बँकेसमोर ,इचलकरंजी

यात आपण सर्वांनी सहभागी व्हावे .तसेच आपल्या परिचित साहित्य कला रसिकांनाही सांगावे नम्र विनंती.

स्नेहांकित
दिलीप शेंडे ( ९९२२९०००००) रोहीत शिंगे ( ७०५७३३४४६६) प्रसाद कुलकर्णी (९८५०८ ३०२९०)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *