अस्मिता खेलो इंडिया लीग योगासन स्पर्धेत 247 खेळाडूंनी घेतला सहभाग

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : भारतीय क्रीडा प्राधिकरण,योगासन भारत, महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया लीग 2025-26 अंतर्गत योगासन स्पर्धा स्वामी योगानंद योग भवन येथे पार पडल्या.247 खेळाडूंनी यात सहभाग घेतला.उद्घाटनप्रसंगी स्वागत व प्रास्ताविक कोल्हापूर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरेश जाजू यांनी केले. दीपप्रज्वलन व स्वामी योगानंद महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे व माजी आमदार सुरेश हाळवणकर, यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश आवाडे होते. सुरेश हाळवणकर म्हणाले,योग केवळ आसने किंवा ध्यान नाही, तर आता तो एक व्यावसायिक व स्पर्धात्मक खेळ झाला आहे. ‘अस्मिता लीग’मुळे महिला व युवतींना आपले कौशल्य सादर करण्याची हक्काची संधी मिळत आहे.”प्रकाश आवाडे म्हणाले,“योग हा भारताची ओळख आहे. ही अस्मिता देशभरात आणि जगभर पोहोचवण्याचे कार्य ‘खेलो इंडिया लीग’ करत आहे. योग आता खेळाच्या रूपात उदयास येत असून त्यात करिअर घडवण्याच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत.”

कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर खापणे, लक्ष्मीकांत मर्दा, दगडुलाल मर्दा चॅरिटेबल ट्रस्ट, डी. के. टी. ई. संस्थेचे संचालक शेखर शहा, राज्य क्रीडा मार्गदर्शक रवि भूषण कुमठेकर, कोल्हापूर गुरुप्रसाद योग परिषदेचे व कोल्हापूर डिस्टिक स्पोर्ट्स पदाधिकारी पांडुरंग मेटे, विजय हावळे, मोहन सातपुते, उपस्थित होते.स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:वयोगट – 18 वर्षाखालील मुली:1. शर्वरी माळी – सुवर्ण पदक2. भूमिका जोशी – रजत पदक3. श्रीया खोंद्रे – कांस्य पदक4. हर्षदा करंबेळकर – चौथा क्रमांक5. झीनत मोमीन – पाचवा क्रमांकवयोगट – 18 वर्षावरील महिला:1. प्रज्ञा गायकवाड – सुवर्ण पदक 2. सानिका जाधव – रौप्य पदक3. सेजल सुतार – कांस्य पदक4. सेजल वरदाई – चौथा क्रमांक5. ऐश्वर्या पाटील – पाचवा क्रमांक

बक्षीस समारंभ माजी नगराध्यक्ष सौ. अलका स्वामी यांच्या उपस्थितीत पार पडला, सौ स्वामी म्हणाल्या“योगाचा प्रसार शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही झाला पाहिजे. महिलांना या क्षेत्रात पुढे नेण्याचे काम ‘अस्मिता लीग’ करत आहे, हे अत्यंत प्रशंसनीय आहे.”समारंभास जय हिंद मंडळाचे अध्यक्ष उदय चव्हाण, सचिव दीपक ढोकळे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीचे पदाधिकारी संदीप सुतार, सचिन येलाजा, अमित पोद्दार, लिंगराज कित्तुरे, लक्ष्मीकांत बांगड, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी चे अध्यक्ष संजय घायतिडक, यांची उपस्थिती होती.

स्पर्धेसाठी पंच म्हणून सुहास पवळे, निलेश कागीनकर, संदीप कुंभार, जय पवार, घननिळ लोंढे, ओंकार दाभोळे, पुनम खोत, सुमित पोटे, दीपक दुरुगडे, वीणा श्रेष्ठी, अभिषेक खोत, समीर सनगर, नंदन मालपाणी, संस्कृती सारडा, अमृता पोवार, सई पाटील यांनी कार्य पाहिले स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अल्पेश गोगड,एकनाथ कांबळे दीपक मिरगे, रावसाहेब पाटील, दीनानाथ होगाडे, शंकर उडपी, डॉ. कुलदीप पाटील, सौ. सुषमा पाटील, सुशील कोष्टी, किरण घडवीर उर्मिला पाटील, सुरज शेट्टी, अशोक जाडर, तुषार सुतार, सौ. लीना म्हेतर, सौ. अनुराधा धूत यांनी योगदान दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोल्हापूर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे खजिनदार रवी कुमार शर्मा, तर आभार प्रदर्शन कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग परिषदेचे सचिव धनंजय सातपुते यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *