वस्त्रनगरी वृत्तसेवा/ विक्रम खांडेकर
इचलकरंजी : महानगरपालिका निवडणुकीसाठी आज गुरुवारी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली.अनेक बड्या नेत्या आज जाहीर झालेल्या प्रभाग रचनेवरून धक्का बसला आहे.
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रारुप प्रभाग नकाशा महानगर पालिकेच्या* *Ichalkaranjimnp.in* *या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत आलेली आहे.* तरी आपण इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक प्रारुप प्रभाग नकाशा पाहण्या साठी https://ichalkaranjimnp.in/general-election-2025/या लिंकवर किंवा खालील क्यु आर कोडवर क्लिक करावे ही विनंती. आयुक्त तथा प्रशासक इचलकरंजी महानगरपालिका

संपूर्ण राजकीय वर्तुळाचे प्रभाग रचनेकडे लक्ष लागून राहिले होते.महापालिका स्थापन झाल्यानंतर प्रथमच निवडणूक ६५ जागांच्यासाठी निवडणूक होणार आहे.चार सदस्य प्रभागाची संख्या १५ आणि पाच सदस्य आलेला एक प्रभाग असणार आहे.गाव भागातील प्रभाग क्रमांक १६ मध्ये सर्वात जास्त लोकसंख्या २४४०८ तर सर्वात कमी प्रभाग क्रमांक १३ मध्ये लोकसंख्या १६४६३ आहे.अनेक माजी नगरसेवकांचे वॉर्ड फुटले आहेत.त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.
