मुट कोर्ट स्पर्धेत इचलकरंजीच्या दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजला उत्तेजनार्थ पारितोषिक

वस्त्रनगरी वृत्तसेवा/ विक्रम खांडेकर

इचलकरंजी : भारती विद्यापीठ, कोल्हापूर न्यू लॉ कॉलेज ,या ठिकाणी घेण्यात आलेल्या मुट कोर्ट अभिरूप न्यायालय स्पर्धेमध्ये दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला.मुट कोर्ट अभिरूप न्यायालय स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयानी सहभाग नोंदविलेला होता. त्यापैकी नव्याने सुरू झालेल्या विधी महाविद्यालयापैकी दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजनेही सहभाग घेतला होता. विद्यार्थी नोबेल कांबळे , एन. ए. कुलकर्णी, कुमारी तेजस्विनी खानविलकर यांनी सादरीकरण केले.महाविद्यालयाच्या संघास उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. स्पर्धेसाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, सेक्रेटरी शुभांगी गावडे तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कौस्तुभ गावडे सर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सी.एस.बागडी , सौ.आरती खड्ड, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ,यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *