अंगारकी संकष्टीसाठी इचलकरंजीतून गणपतीपुळेला विशेष बस

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : मंगळवार, 12 ऑगस्ट रोजी येणाऱ्या अंगारकी संकष्टी निमित्त गणपतीपुळे येथे जाणाऱ्या भाविकांसाठी इचलकरंजी बस स्थानकावरून विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे. पहाटे सहा वाजता ही विशेष बस इचलकरंजी येथून गणपतीपुळेच्या दिशेने रवाना होणार असून, परतीचा प्रवास दुपारी तीन वाजता गणपतीपुळ्यातून सुरू होणार आहे.या विशेष बस सेवेचा गणेशभक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन इचलकरंजी आगार व्यवस्थापक सागर पाटील यांनी केले आहे.

याशिवाय, सुरू असलेल्या श्रावण मासानिमित्त विविध धार्मिक स्थळांवर जाणाऱ्या प्रवाशांसाठी आगारामार्फत विशेष बसेसचीही व्यवस्था करण्यात आली आहे.धार्मिक पर्यटनासाठी इच्छुक नागरिकांनी इचलकरंजी आगाराशी संपर्क साधावा, असे आवाहनही पाटील यांनी यावेळी केले आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता आगार प्रशासनाकडून ही उपयुक्त सेवा उपलब्ध करून देण्यात येत असून, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुन्हा एकदा करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *