वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : मतदारसंघातील माता-भगिनींना योग्य तो सन्मान मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आमदार राहुल आवाडे यांनी केले. वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असलेल्या इचलकरंजी मतदारसंघात जितका पुरुष काम करतो तितकीच मेहनत येथील माता-भगिनीही घेतात. यंत्रमाग व्यवसायाबरोबर गारमेंट व्यवसायही प्रगतीपथावर असून इचलकरंजी गारमेंट सिटी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे महिलांनी पुढाकार घेऊन स्वावलंबी बनावे, त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

भारतीय जनता पार्टी शहर कार्यालयात रविवारी भाऊ-बहिणींचे नाते जपणारा रक्षाबंधन सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील सुमारे ५०० पेक्षा अधिक बहिणींनी माजी मंत्री प्रकाश आवाडे व आमदार राहुल आवाडे यांना राखी बांधली. महिलांची सुरक्षितता व सक्षमीकरणासाठी मी सदैव तुमचा भाऊ म्हणून पाठीशी उभा राहीन, असे आश्वासनही आमदार आवाडे यांनी दिले.या वेळी प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, भाजपा शहर पूर्व मंडल अध्यक्ष श्रीरंग खवरे, पश्चिम मंडल अध्यक्ष शशिकांत मोहिते, नरसिंह पारीक, राजु भाकरे, अश्विनी कुबडगे, रमा फाटक, पुनम जाधव, नजमा शेख, सपना भिसे, अर्चना कुडचे, सीमा कमते, जयश्री शेलार, मंगल सुर्वे, सुवर्णा लाड, नागुबाई लोंढे यांच्यासह महिला, तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
