पन्हाळगडावरील शिवछत्रपतींच्या आरतीस उपस्थित राहण्याचा मान – कृष्णराज महाडिक

वस्त्रनगरी वृत्तसेवा

पन्हाळा : दर पौर्णिमेस गेली 13 वर्षे अखंडपणे नवीन युवक सेनेतर्फे पन्हाळगडावरील शिवछत्रपतींचा जागर आयोजित केला जातो. महाराष्ट्रातील गिरीदुर्गावरील एकमेव शिवछत्रपती मंदिर येथे असून, सन 1913 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी याची स्थापना केली आहे.आजच्या पौर्णिमेस मंदिरात युथ आयकॉन मा.श्री. कृष्णराज धनंजय महाडिक, कलानगरचा महागणपती ग्रुप, मा.श्री. अभिषेक वाळवेकर, चल भावा सिटीत चे विजेते मा.श्री. ऋषिकेश चव्हाण, तसेच बडोदा घराण्यातील गायकवाड वंशज मा.श्री. योगेश गायकवाड सरकार यांच्या हस्ते शिवमूर्तीस अभिषेक करण्यात आला.

अध्यक्ष संतोष कांदेकर यांनी शिवमंदिर व पन्हाळ्याचा इतिहास सांगितल्यानंतर प्रेरणामंत्र, शिवसूर्यहृदय मंत्र, ध्येयमंत्र पठण व आरती संपन्न झाली. फटाक्यांची आतषबाजी करून कार्यक्रमाची सांगता झाली.प्रमुख पाहुणे कृष्णराज महाडिक यांनी भावनिक मनोगत व्यक्त करताना, शिवछत्रपतींच्या आरतीचा मान मिळाल्याबद्दल मी टीमचे आभार मानतो. माझ्या महाडिक कुटुंबियांच्या वतीने एखाद्या पौर्णिमेस निश्चित येईन व प्रत्येक युवकाने या जागरात सहभागी व्हावे असा संकल्प व्यक्त केला.या कार्यक्रमास प्रा. आनंद गिरी, थोरबोले सर, शिवश्री पुंडलिक बिरंजे, जयसिंग चौगुले, रमेश खोपकर, नागेश यादव, संजय जासूद, शिवाजी ठाणेकर, संजय चौगुले, जितू केंबळे, आतिश पाटील, चंद्रकांत यादव, केतन मिरजे, सतिश सुतार आदी शिवभक्त उपस्थित होते.सर्किट बेंच मंजुरीत मोलाचा वाटा असणारे ऍड. प्रसाद जाधव व सोशल मीडियाद्वारे सामाजिक कार्य करणारे सॅम आठवले यांचेही कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *