आंतरराष्ट्रीय उद्योजक प्रशांत बोरा यांचे उद्या गुरुवारी इचलकरंजीत व्याख्यान

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : इचलकरंजीचे सुपुत्र आणि आंतरराष्ट्रीय उद्योजक तसेच बोरा मल्टिकॉर्पचे सर्वेसर्वा प्रशांत प्रकाशजी बोरा, पुणे यांचे आंतरराष्ट्रीय व्यापारातील संधी, कार्यतत्परता, उद्योग विश्वातील नव संकल्पना या विषयावरील ‘वेध भरारीचे’ हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवार दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता येथील श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह, इचलकरंजी येथे हे संपन्न होणार आहे, अशी माहिती संयोजकांच्यावतीने देण्यात आली आहे.

रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी, जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) परिवार इचलकरंजी, लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी व महेश क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. शहर व परिसरातील सर्व उद्योजक व निर्यात करू इच्छिणाऱ्या तसेच व्यवसाय वृद्धीचे स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी हे व्याख्यान प्रेरणादायी ठरेल, या उद्देशाने याचे आयोजन केले आहे. श्री. प्रशांत बोरा यांचे अनुभव आणि आंतरराष्ट्रीय उद्योगविश्वातील दृष्टीकोन ऐकण्याची ही एक अनमोल संधी आहे. उद्योजकतेच्या नव्या वाटा, निर्यात क्षेत्रातील संधी, आणि जागतिक स्तरावर यशस्वी होण्याचे मार्गदर्शन या व्याख्यानातून मिळणार आहे. ज्यांना व्यवसायात भरारी घ्यायची आहे, नव्या कल्पनांना मूर्त स्वरूप द्यायचे आहे आणि जागतिक बाजारपेठेत पाऊल ठेवायचे आहे त्यांनी हे व्याख्यान चुकवू नये. आपण स्वतः आणि आपल्या सहकाऱ्यांसह उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *