वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : शहरातील विविध विभासाठी मंजूर झालेल्या ६ जलकुंभ उभारण्यासाठी तत्काळ कार्यादेश द्यावेत अशी मागणी भाजपचे शहर उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी आयुक्त पल्लवी पाटील यांच्या कडे निवेदनाद्वेरी केली आहे.शहरास वाढीव भागासाठी मुबलक पाणीपुरवठा होणेसाठी तत्कालीन आमदार प्रकाश आवाडे यांनी सतत राज्य शासनाकडे पाठपुरावा करून महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेतून ६ जलकुंभ व दाबनलीका टाकणे, पंपिंग मशिनरी उभारणे तसेच इतर कामासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,अजित पवार यांच्या सहकार्याने 31 कोटी 37 लाख रुपये मंजूर केले आहेत.
इथे उभारणार जलकुंभ : पि. बा. पाटील मळा ११ लाख लिटर्स क्षमता, शांतीनगर १० लाख लिटर क्षमता,जवाहरनगर १४ लाख लिटर क्षमता,जुना चंदूर रोड ८ लाख लिटर क्षमता,तोरणानगर १३ लाख लिटर क्षमता,तुळजाभवानीनगर – १२ लाख लिटर क्षमता.
या कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यासह तीन महिन्यांत कार्यादेश देण्याबाबत शासनाने बंधनकारक केले आहे. काम पूर्ण करण्याचा कालावधी 18 महिन्यांचा आहे. जीवन प्राधिकरणकडून या जलकुंभ उभारण्यासाठी विलंब होत असल्याने आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्या नंतर काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या कडून इचलकरंजी महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यानंतर २२ मे २०२५ रोजी निविदा प्रक्रिया झाली. बराच कालावधी पूर्ण झाला आहे. तरी ६ जलकुंभ उभारण्यासाठी त्वरीत कार्यादेश देऊन प्रत्यक्ष जलकुंभ व इतर कामाला सुरुवात करावी. इचलकरंजी शहरातील वाढीव भागातील लोकांना दैनंदिन मुवलक व स्वच्छ पाणी पुरवठा करता येईल. असे दाभोळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
