इचलकरंजीत प्रांताधिकारी कार्यालयात दीपक शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रांताधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार राहुल आवाडे यांनी उपस्थिती लावली.

प्रांताधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी केले. पोलिसांनी राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली. गर्ल्स हायस्कूल आणि आंतरभारती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या. त्यांनी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर केले. या कार्यक्रमास अपर तहसीलदार महेश खिलारे,माजी आमदार सुरेश हाळवणकर,अशोकराव स्वामी, तानाजी पोवार, शिरस्तेदार तथा नायब तहसीलदार संजय काटकर,राजन मिठाने,मंडलाधिकारी राजू बावणे, तलाठी,पत्रकार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *