वस्त्रनगरी वृत्तसेवा
कबनूर : सत्यराज मल्टीपर्पज चॅरिटेबल ट्रस्ट, कबनूर यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गावातील गरीब व होतकरू 300 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम संत गाडगेबाबा मठ येथे उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी गावचे ज्येष्ठ नेते कै. सुधाकरराव मणेरे (मामा) यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते आदित्य आवाडे, मार्गदर्शक शितलकुमार मणेरे, बी. डी. पाटील, सुधीर लिगाडे, निलेश पाटील, अरुण मणेरे, स्वनिल केटकाळे, किरण परीट उपस्थित होते.कार्यक्रमास ट्रस्टचे अध्यक्ष अनिकेत लोखंडे यांच्यासह अमोल खांडेकर, आशिष पाटील, अजय आडके, दीपक पाटील, संतोष पाटील, विनायक भोसले, पंकज धनगर, दादासो कांबळे, विजय भोसले, उदय मस्के, अमोल सुतार, अक्षय पाटील, चंद्रकांत तारळेकर तसेच ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


