दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजमध्ये आयोजित दांडिया नृत्यात विद्यार्थ्यांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : येथील दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त दांडिया नृत्याचे आयोजन करण्यात आले होते.त्यात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजमध्ये आज बुधवारी सकाळी एल एल बी आणि बी ए एल एल बी च्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनीसाठी नवरात्र उत्सवानिमित्त दांडिया नृत्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभाग घेतला. दांडियावर आधारित विविध गाण्यावर नृत्य केले.प्राचार्य डॉक्टर चंद्राणी बागडी,संदीप पाटील,गीता खांडेकर,तौफिक नायकवडी,अजर दाढीवाले विद्यार्थी प्रतिनिधी सतेज हजारे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *