वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : “देशभक्तांच्या विचारांची जोपासना करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयाचे प्रा.रवींद्र पाटील यांनी केले.येथील व्यास ऑलिंपियाडच्यावतीने आयोजित स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल सोलनकर होते.

प्रारंभी प्रा. रवींद्र पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. मुख्याध्यापिका पूजा ढवळीकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मिलिंद फुले यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.कोमल सावंत,रूपाली गायकवाड,सरिता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.अश्विनी कालेकर,स्मिता फडके हरी सुडके आदी उपस्थित होते.करुणा पवार यांनी सूत्रसंचालन केले.नाज नालबंद यांनी आभार मानले.

