सत्तेचा काय उपयोग? पुलावर प्रवेशबंदी का नाही? राज ठाकरे सरकारवर भडकले

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला. यात काही लोकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. पूल धोकादायक असताना प्रवेशबंदी का नव्हती, असा सवाल त्यांनी विचारला. तसेच, या दुर्घटनेला सरकार जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मावळ तालुक्यात झालेल्या या दुर्घटनेवरून राज ठाकरे यांनी सरकारला विविध प्रश्न विचारत कात्रीत पकडलं आहे. पूल धोकादायक होता, तर तो पाडून नवीन का बांधला नाही? सरकारचे विभाग काय करतात? पावसाळ्याआधी धोकादायक पुलांची तपासणी का केली जात नाही? असे प्रश्न त्यांनी विचारले. “बचावकार्य वेगाने सुरु आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभं आहे…”, असे नेहमी सरकार बोलते. पण, ही वेळ का येते, असा सवालही त्यांनी केला.

पावसाळा सुरू झाला आहे. अनेक शहरांमध्ये पाणी साठतं आहे. रस्त्यांची चाळण झाली आहे. पूल तुटत आहेत. सरकारने युद्धपातळीवर काम करून लोकांना त्रास कमी करावा, असे राज ठाकरे म्हणाले. “जर येत नसतील तर मग तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा तुम्हाला असेल उपयोग पण राज्याला काय उपयोग ?” असा सवाल त्यांनी सरकारला विचारला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *