वस्त्रनगरी विशेष वृत्त / विक्रम खांडेकर
इचलकरंजी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष पदी सुहास अशोकराव जांभळे यांची नियुक्ती केल्याने इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील पक्ष वाढीला मोठे बळ मिळणार आहे. पक्षाने युवा चेहरा दिल्याने युवक हे मोठ्या प्रमाणात पक्षाकडे आकृष्ट होण्यास मदत होईल.आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारणी मध्ये बदल करताना इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्षपदी सुहास अशोकराव जांभळे यांची नियुक्ती करण्यात आली.

शहरांमध्ये तसेच इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या चंदुर, कबनूर कोरोची तारदाळ, खोतवाडी या गावांमध्ये तसेच शहरातील गणेश नगर, शहापूर, विक्रम नगर, भोने माळ आधी परिसरामध्ये जांभळे कुटुंबाला मानणारा एक मोठा वर्ग शहरात आहे. नगरपालिका तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये जांभळे कुटुंबांने आपले असत्व मताधिक्य घेऊन सिद्ध केले आहे. गणेश नगर परिसरामध्ये सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्याबरोबर आपल्या कुटुंबातील तीन व्यक्तींना एकाच वेळी निवडून आणत जनतेमध्ये जांभळे कुटुंबाबद्दल असलेले प्रेम आणि जिव्हाळा दिसून येतो. अशोकराव जांभळे आणि स्वर्गीय नितीनराव जांभळे यांनी एक वेगळी ओळख कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या निर्माण केले आहे. हाकेला धावणारे हजारो कार्यकर्ते आणण्याची ताकद आणि धमक जांभळे यांच्यात आहे. स्वर्गीय नितीनराव जांभळे यांच्यानंतर त्यांचा खंबीर वारसा बंधू सुहास जांभळे सांभाळत आहेत. त्यांची ही युवकांच्यात मोठी क्रेझ आहे. त्यांनी अल्पावधीतच आपल्या परिसरामध्ये पकड निर्माण केली आहे असे म्हटल्यास अतिशय ठरणार नाही. मनमिळावू आणि शांत स्वभावामुळे सुहास यांची जनतेमध्ये चांगली छाप पडताना दिसत आहे.

प्रत्येक गोष्ट समजावून घेणे आणि ती सोडवण्यासाठी धडपडणे, कार्यकर्त्यांच्या मदतीसाठी धावून जाणे, कार्यकर्त्यांना मदत करणे हे त्यांच्यातील गुण लोकांना भावत आहेत.त्यामुळेच कार्यकर्त्यांचा मोहोळ आता त्यांच्या सोबत असल्याचे दिसून येते. त्यांना दिलेली जबाबदारी ते समर्थपणे सांभाळणार याविषयी शंका असण्याचे कोणतेही कारण नाही. हे ओळखून आहेस पक्षाने त्यांना मोठी जबाबदारी दिली आहे. आगामी काळात महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीमध्ये ते आपले कामगिरी तर दाखवतीलच त्याचबरोबर पक्षातील नगरसेवक जास्तीत जास्त कसे विजयी होतील यासाठी त्यांचा असल्याचे आता दिसून येत आहे.
