वस्त्रनगरी वृत्तसेवा
इचलकरंजी : ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने क्रांतीवीरांना अभिवादन करण्यात आले. येथील पुरवठा कार्यालयाच्या प्रांगणातील स्मृती स्तंभास आमदार राहुल आवाडे व माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जयघोषांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.९ ऑगस्ट हा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील ऐतिहासिक टप्पा असून, याच दिवशी सुरू झालेल्या आंदोलनामुळे ब्रिटिशांना भारत सोडावा लागला. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतीवीरांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.या कार्यक्रमाला इचलकरंजी शहर पूर्व मंडल अध्यक्ष श्रीरंग खवरे, ग्रामीण मंडल अध्यक्ष बाळासाहेब माने, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, महावीर कुरुंदवाडे, चंद्रकांत इंगवले, अनिल कुडचे, राजू बोंद्रे, शेखर शहा, नरसिंह पारीक, एम. के. कांबळे, प्रमोद बचाटे, सुखदेव माळकरी, चंद्रकांत कोष्टी, वसंत येटाळे, मारुती पाथरवट, किशो पवार, राजू दरीबे, बजरंग कुंभार, सर्जेराव हळदकर, सचिन माळी, बापू घुले, प्रमोद काडाप्पा, नजमा शेख, मंगल सुर्वे, सुवर्णा लाड, सीमा कमते, सपना भिसे, तुळसाबाई काटकर, जयश्री शेलार, माधवी देसाई, विद्या लवटे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

