एनसीसी कॅडेटने बांधल्या राख्या

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयात एनसीसी विभागाच्या वतीने रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी एनसीसी कॅडेट मुलींनी प्राचार्य डॉ. एस. के. खाडे, यांच्यासह उपस्थित मान्यवर आणि एनसीसी कॅडेट यांना राखी बांधून आणि औक्षण करून रक्षाबंधन साजरा केला.

” भारतीय सण हे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवत असतात. महाविद्यालयात असे उपक्रम साजरे केल्याने विद्यार्थ्यांमध्ये बंधुत्वाची भावना कायम राहते त्यामुळे असे उपक्रम नेहमी राबवले पाहिजेत ही आनंदाची बाब आहे.” अशा भावना व्यक्त करत प्राचार्य डॉ. एस. के. खाडे यांनी मुलांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी महाविद्यालयाचे दुपार सत्र प्रमुख प्रा. डी. ए. यादव, प्रबंधक श्री. आर. बी. जोग यांची विशेष उपस्थिती होती. एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. विनायक भोई यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रा. रोहित शिंगे यांनी प्रास्ताविक केले. लेफ्टनंट प्रा. विनायक भोई यांनी आभार मानले. यावेळी एनसीसी कॅडेट आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *