वस्त्रनगरी वृत्तसेवा
कोल्हापूर : राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडले असून 4356 क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. 25 जुलै 2025 रोजी रात्री 10.15 वाजता राधानगरी धरणाचे स्वयंचलित द्वार क्र. 1 व 6 उघडले असून दोन्ही मधून 2856 क्युसेक व पॉवर हाऊस मधून 1500 क्युसेक असा एकूण 4356 क्युसेक इतका विसर्ग नदी पात्रात सुरु आहे.स्वयंचलित द्वार क्र. ३ यापूर्वीच उघडला आहे. नदी काठच्या लोकांनी दक्षता घ्यावी.असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय यांनी केले आहे.
