सुळकुड पाणी प्रश्नावर विरोधक राहुल आवाडे यांना घेरणार

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : सुळकुड पाणी योजनेवरून आगामी काळात आमदार राहुल आवाडे यांना घेरण्याची रणनीती विरोधकांनी बनवली असून आवाडे या चक्रव्यूमधून कसे बाहेर पडणार हे पाहावे लागणार आहे.पाणी प्रश्न सोडविण्यात दोन आमदारांना यश आले नाही.आता राहुल आवाडे हा प्रश्न कसे सोडविणार हे पहावे लागेल.इचलकरंजीकरांच्या दृष्टीने पाणी प्रश्न हा जिव्हाळ्याचा विषय आहे.माजी आमदार सुरेश हाळवणकर,प्रकाश आवाडे यांना दानोळी अथवा सुळकुड योजनेतून इचलकरंजीला पाणी आणता आले नाही.हाळवणकर यांचे दहा वर्षे आणि प्रकाश आवाडे यांचे ५ वर्षे नुसती घोषणेत गेली.तरीही पाणी प्रश्न सुटलेला नाही. विद्यमान आमदार राहुल यांनी पाणी प्रश्न हातात घेतल्याचा आणि या प्रश्नाला प्राधान्य दिल्याचे अनेक वेळा जाहीर केले आहे.मात्र पाणी प्रश्नावर म्हणावे तितकी प्रगती झालेली नाही. शुक्रवारी महाविकास आघाडीतील नेत्यांनी पाणी प्रश्न उपस्थित करून राहुल आवाडे यांना घेराण्याचे धोरण आखले आहे. आघाडी कडून चांगली रणनीती बनविण्यात येत असून आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपा आणि आवाडे यांच्या तोंडचे पाणी पळविण्यात शशांक बावचकर सागर चाळके राहुल खंजिरे संजय कांबळे मदन करांडे,सयाजी चव्हाण सदा मलाबादे हे नेते किती यशस्वी होतात ते पाहावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *