महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर सोमवारी इचलकरंजीत

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात महिला सक्षमीकरण राबविण्यात येत आहे. त्यानुसार “सक्षम तु” हा कार्यक्रम सोमवारी दुपारी 3 वाजता येथील अशोका सायझिंग गणेश नगर येथे आयोजित करण्यात आला असून त्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष सौं. रूपालीताई चाकणकर भूषविणार आहेत.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील (असुरलेकर) कार्याध्यक्ष अनिल साळुंखे कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष सौं. शितलताई फराकटे, माजी आमदार श्री.अशोकरावजी जांभळे साहेब शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे कार्याध्यक्ष अमित गाताडे आदींसह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक किशोरी साबळे हे महिलांचे संरक्षण, सक्षमीकरण, निर्भया पथक, व त्यांचे टोल फ्री क्रमांक आधी विषयावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणार आहेत.तरी भागातील महिला व मुलींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *