होड्यांच्या शर्यतीत ‘तरुण मराठा बोट क्लब अ’ने चांदीची गदा पटकावली

वस्त्रनगरी वृत्तसेवा

इचलकरंजी : ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित पारंपरिक होड्यांच्या शर्यतीत सांगलवाडीच्या ‘तरुण मराठा बोट क्लब अ’ने सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावत चांदीची गदा जिंकली. दुसरा क्रमांक डिग्रज बोट क्लब डिग्रज, तिसरा कवठेसारचा युवा शक्ती बोट क्लब, तर चौथा डिग्रजच्या जय मल्हार बोट क्लबने मिळवला.स्पर्धेनंतर आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते विजेत्या संघांना बक्षिस वितरण करण्यात आले. ३५ वर्षांच्या परंपरेनुसार आयोजित या शर्यतींना यंदाही कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील १० बोट क्लबचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शर्यतीचा शुभारंभ सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली, भाजपा ज्येष्ठ नेते पांडुरंग म्हातुकडे यांच्या हस्ते झाला. पंचगंगा नदीवरील दोन्ही काठांवर व पुलांवर प्रेक्षकांनी मोठी गर्दी करून खेळाडूंना उत्साह दिला.प्रथम क्रमांकासाठी देण्यात आलेली चांदीची फिरती गदा मध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघाचे चेअरमन प्रकाश दत्तवाडे यांच्यातर्फे प्रदान करण्यात आली.

याप्रसंगी पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अप्पर पोलिस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, पोलिस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, श्रीरंग खवरे, पै. अमृत भोसले, अनिल कुडचे, शेखर शहा, राजू पुजारी, तसेच इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते, उपाध्यक्ष नंदु पाटील, अहमद मुजावर, पापालाल मुजावर, शांताप्पा मगदूम, राहुल घाट, शिवाजी काळे, तानाजी कोकितकर, सागर गळदगे, शिवाजी माळी, सागर मगदूम, डॉ. विजय माळी, श्रीकांत कगुडे, बजरंग कुंभार, राजू दरिबे, सागर कम्मे, गणेश बरगाले, इरफान अत्तार, वसीम बागवान, शशिकांत नेजे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र बचाटे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *